
नाशिक : वृत्तसंस्था
आई जर आपल्याला रागावली तर आपली आजी आईला आपल्यासाठी दाटत असते आणि आजी हि नातवाची हि शेवटची मैत्रीण असते असेही म्हटलं जात. लहानपणापासून आईने जे लाड केले नाही ते लाड आपली आजी करत असते. ज्या नातवाला आजी सांभाळते मात्र याच नातवाने आजीची हत्या केल्याची घटना नाशिकच्या हरसूल येथे उघडकीस आली आहे. गंगुबाई रामा गुरव असे मृत्यू झालेल्या आजीचे नाव असून हरसूल पोलीस ठाण्यात नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकी घटना
नाशिक जिल्ह्यातील हरसूल गावातील इंदिरानगर भागात गंगुबाई रामा गुरव (वय ७० वर्ष) या त्यांच्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास आहे. गंगुबाई यांच्या सोबत त्यांचा मुलगा, सून आणि नातू राहतात. मोलमजुरी करून कुटुंब चालवतात. नातू दशरथ किसन गुरव (वय २२ वर्ष) याला दारू पिण्याची सवय जडली होती. सोमवारी रात्री दशरथ हा दारू पिऊन घरी आला होता. रात्री जेवायला दिले नाही याचा राग आल्याने दशरथ याने आजीच्या उजव्या डोळ्याजवळ हातात घातलेल्या लोखंडी कड्याच्या सहाय्याने वार केला. यात आजी गंगुबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. दशरथ नशेत असल्याने त्याने रात्री काय केले हे त्याच्या लक्षात आले नाही. मंगळवारी सकाळी उठल्यावर आजी गंगुबाई यांचा मृत्यू झाला असल्याच लक्षात आल.
सदर घटनेबाबत हरसूल पोलीसाना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी नशेत असलेला नातू दशरथ गुरवला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत. नातवालाच लहानपणी मांडीवर खेळवणाऱ्या आजीचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील तरुण मंडळी सध्या नशेच्या आहारी जात आहेत. नशेत असताना नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना सुद्धा घडल्या आहेत.




















