
नाशिक : वृत्तसंस्था
खान्देशमध्ये गेल्या दोन दिवसापासून परतीचा मुसळधार पाऊस येत आहे. नाशिक, मालेगाव व धुळे जिल्हात तर अनेक गावांचा संपर्कहि तुटला आहे. निफाड येथे तर एक युवती महाविद्यालयात जाण्यासाठी स्कुटीवर निघाली पण रस्त्यात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
निफाडसह नाशकात सध्या तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात एक महिविद्यालयीन तरुणी वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ११ व्या वर्गात शिकणारी तन्वी विजय गायकवाड या तरुणीचा पुराच्या वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे
निफाड तालुक्यातील शिवडी येथून रानवड साखर कारखान्याजवळील के. के. वाघ कनिष्ठ महाविद्यालयात ११ वीत शिकणारी तन्वी विजय गायकवाड ही सोमवारी सकाळी विनता नदीच्या पुरात वाहून गेली. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तन्वी विजय गायकवाड ही सोमवारी सकाळी काँलेजला जात होती. त्यादरम्यान ती ऊगाव खेडे दरम्यान असलेल्या विनता नदीच्या पुलावरुन जात असतांना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ती स्कूटीसह वाहून गेली. तिचा मृतदेह नदीप्रवाहासोबत वाहत जाऊन संत जनार्दन आश्रमशाळेजवळ सापडला. निफाड येथे उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले. निफाड तालुक्यातील रुई येथील विजय गायकवाड यांची ती कन्या होती. शिक्षणासाठी शिवडी येथे मामांकडे राहून कॉलेजला येणं-जाणं करत होती.




















