जळगाव : प्रतिनिधी
जळगाव भुसावळ महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविल्याने शहरातील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगावातील परवेज निसार खाटीक (वय २२, लक्ष्मीनगर, जळगाव ) आणि आमीर जाकीर खाटीक (वय २२, उस्मानिया पार्क ) हे भुसावळ येथून काम आटोपून जळगाव येत असता. आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दूरदर्शन टॉवरच्या समोरच्या अरूंद रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात परवेज हा जागीच ठार झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या आमीर याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असतांना त्याने शेवटचा श्वास घेतला.
