जळगाव मिरर | ७ जानेवारी २०२४
शहरातील सुभाष चौक परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ परिसरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सुभाष चौक परिसरातील भवानी मंदिर परिसरात शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पीडित मुलगी ही आलेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. त्यावेळी तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळून नेले आहे, अशी तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसात दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर या करीत आहे.