जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर परिसरात असलेल्या खडके चाळीमधील श्री गुरुदेव उत्सव समिती मित्र मंडळातर्फे यंदा २२ फुटाच्या बाप्पांची स्थापना करण्यात आली असून दरवर्षाप्रमाणे यंदाही २ हजार १११ दिव्यांची महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
४ सप्टेंबर रोजी दुपारी महाआरोग्य शिबिर तर सायंकाळी महाआरती त्यानंतर रात्री महिला मंडळातर्फे भजनसंध्याचे आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आले आहे. तरी शहरातील गणेशभक्तांनी या महाआरतीस उपस्थिती देण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिपक झुंझारराव, उपाध्यक्ष आकाश जाधव, सचिव अतुल शिरसाळे यांनी केले आहे.