जळगाव मिरर | १९ मे २०२३
अमळनेर शहरात सुरु असलेल्या एका यात्रेदरम्यान २४ वर्षीय विवाहितेचा चार तरुणांनी पतीसमोर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात चार जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बोरी नदी पात्रात यात्रा सुरु असतांना दि १८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास २४ वर्षीय विवाहिता आपल्या पतीसोबत यात्रेत गेली असता. यात्रेतील एका ठिकाणी रांगेत उभी असतांना ४ तरुण या ठिकाणी रांगेत असतांना महिलेच्या पतीला एका मुलाचा धक्का लागला यावेळी त्या तरुणांना पतीने बोलले असता ते तरुणांनी पतीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केल्याने महिला याचे भांडण आवरण्यास गेली असता. त्या तरुणांनी २४ वर्षीय महिलेला शिवीगाळ करीत असल्याने महिलेच्या नातेवाईकानी या तरुणांना ओळखले असता त्या चार तरूणाविरोधात अमळनेर पोलिसात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ.विलास पाटील हे करीत आहे.