जळगाव मिरर । १३ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक भागात चोरीच्या घटना घडत असतात काही दिवसात या चोरीतील आरोपी पोलिसांना सापडत असतात, त्यामुळे हि घटना काही नवीन नाही पण अशाच एका चोरीच्या टोळीतील प्रमुख एक ६३ वर्षीय महिला आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजी नगर, सोलापूर व लातूर या परिसरातून अनेक ठिकाणी चोरी करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ६३ वर्षीय रामबाई हरगोविंदसिंग सिसोदिया ही मंगल कार्यालयात पुतण्या, मुलगा व आठ वर्षांच्या नातवंडासह चोऱ्या करणाऱ्या टोळीची प्रमुख होती. ३ डिसेंबर रोजी हॉटेल रामा इंटरनॅशनल व औरंगाबाद जिमखान्यात चोरी करून सोलापूर, लातूरमध्ये प्रयत्न केला. पुन्हा शहरात येऊन बीडला जात असताना पाचोड परिसरात गुन्हे शाखेने या टोळीच्या मुसक्या आवळल्या. रामबाईसोबत सुनेचा भाऊ सोनू रम्मो सिसोदिया (२५), पुतण्या आशिष बलराम सिसोदिया (३४) व नातवाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगा गौतम मात्र पोलिसांसोबतच्या निसटला. झटापटीत ३ डिसेंबर रोजी जिमखाना क्लबमध्ये सुनील जैस्वाल यांच्या पत्नीची ५ लाख २५ हजारांच्या दागिन्यांची बॅग चोरीला गेली. दोन तासांनी हॉटेल रामा इंटरनॅशनलमधून दीपक कदमबांडे यांच्या भाच्याच्या लग्नातून साडेतीन लाख रुपये असलेले बॅग चोरीस गेली.९ डिसेंबरपर्यंत शहरात लग्न समारंभातून चोरीच्या ६ घटना घडल्या होत्या.