अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील पाडसे येथील विकास सोसायटी वर आमदार अनिल भाईदास पाटील यांचे वर्चस्व निर्माण झाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. नुकतीच ही निवडणूक पार पडल्यानंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत व सत्कार अनिल भाईदास पाटील यांनी केला यावेळी सोबत डॉ रामराव पाटील,गौरव पाटील,संतोष त्रंबक पाटील,चतुर बाबुराव पाटील,संतोष बुधा पाटील,विठ्ठल ढोमण पाटील,बाळू आबाजी पाटील.राजेंद्र संतोष पाटील,निंबा चिंधा पाटील,रामकृष्ण भगवान कोळी आदी उपस्थित होते.
हे आहेत परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार
गणेश पुंडलिक पाटील,मुकेश्वर पोपट कोळी, विश्वास जीवन कोळी,रामभाऊ यशवंत पाटील, वसंत आत्माराम पाटील, विकास अशोक पाटील,खंडू रामदास पाटील,प्रकाश दयाराम पाटील,गिरीश रमेश पाटील सौ.पुष्पाबाई हंसराज सनेर, सौ.चंद्रभागाबाई दिलीप पाटील, श्री.सुखदेव श्रावण गव्हाणे, श्री.एकनाथ काशिनाथ नाथबुवा.दरम्यान राजेंद्र संतोष पाटील,राहुल पाटील, हंसराज सनेर, यांनी पॅनल विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले.