जळगाव मिरर / १६ जानेवारी २०२३
शहर भाजपची आज दिनांक १६ जानेवारी सोमवार रोजी वसंत स्मृती भाजप कार्यालय येथे संघटनात्मक बैठक आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ग्रामीण सुरेश राजू मामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी महापौर सीमाताई भोळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, जिल्हा चिटणीस महेश चौधरी, राहुल वाघ, भगतसिंग निकम, राजू मराठे, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, अक्षय चौधरी, नीलाताई चौधरी, आघाडी अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, सरचिटणीस रेखाताई वर्मा, सरोज पाठक, अशोक राठी, प्रमोद वाणि, हेमंत जोशी इतर पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांवर मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष राजूमामा यांनी केले असून यात प्रामुख्याने परीक्षा पे चर्चा विद्यार्थ्यांशी संवाद यासंदर्भात तसेच २६ जानेवारी गणतंत्र दिवस निमित्त भारत मातेचे पूजन व राष्ट्रध्वज पूजन कार्यक्रम प्रत्येक मंडळ व बूथ स्तरावर करण्याचे आवाहन आमदार भोळे यांनी व्यक्त केले तसेच २० ते २५ जानेवारी रोजी नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा करून घेणे संदर्भात करण्यात आले. तसेच पक्षाचे सरल पोर्टलवर नोंदणी करून घेणे याबद्दलही सांगण्यात आले यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक श्री विशाल भाऊ त्रिपाठी यांनी केले तर आभार प्रदर्शन धीरज वर्मा जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख यांनी केले.