जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२३
देशभरातील अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास असलेल्या कंपनी म्हणून नावाजलेली LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आणि गुंतवणूकदार कंपनी आहे. मात्र, आता एलआयसीला आयकर विभागाकडून धक्का बसला आहे. आयकर विभागाने एलआयसीला नोटीस पाठवली असून, त्यात कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयकर विभागाने भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या सरकारी कंपनीला 84 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एलआयसीने आपल्या एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, हा दंड 2012-13, 2018-19 आणि 2019-20 या मूल्यांकन वर्षांसाठी लावण्यात आला आहे. विमा कंपनीने सांगितले की ते अपील प्राधिकरणासमोर अपील दाखल करणार आहे. विमा पॉलिसींच्या बदल्यात लोकांची बचत गोळा करणे आणि देशातील बचतीला चालना देणे, सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवून लोकांच्या भांडवलाचे संरक्षण करणे, वाजवी दरात विमा पॉलिसी जारी करणे, उद्योगांना वाजवी व्याजदरावर कर्ज देणे हे LIC चे काम आहे. व्यापार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, काल एनएसईवर एलआयसीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. काल LIC चे शेअर 4.75 पैशांनी घसरून 645.00 रुपयांवर बंद झाले.