जळगाव मिरर | ७ नोव्हेबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसत असतांना अनेक नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे तर दिवाळीपूर्वी देशांतर्गत सराफा बाजारात वरच्या पातळीवरून दबाव दिसून येत असून सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याची किंमत ६०८०९ रुपये झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही १०० रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीचा दर ६०८०० रुपये प्रति किलोवर आला आहे. देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत २१० रुपयांहून अधिक घसरण झाली आहे.
देशांतर्गत बाजाराबरोबरच जागतिक कमोडिटी मार्केटमध्येही नरमाई दिसून येत आहे. यापूर्वी, अमेरिकन जॉब डेटा आणि फेडरल रिझर्व्हच्या निर्णयांमुळे किमती सतत वाढत होत्याआंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या- चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. कॉमेक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस १९९० डॉलरवर व्यापार करत आहे. चांदीची किंमतही थोडी घसरून २३.२६ प्रति औंस झाली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत २४ कॅरेट सोन्याचे भाव ६०९२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारचा भाव २०० रुपयांनी कमी आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५,८४३ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. यासोबतच चांदीचा भाव ७२,३०० रुपये प्रति किलो इतकी आहे. राज्यातील महत्त्वाची सोन्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव ६१,४५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५६,२९० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे