जळगाव मिरर / २५ मार्च २०२३ ।
जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून अपघाताची संख्या दिवसेदिवस वाढत चाललेली आहे. दोन दिवसापूर्वी मानराज पार्क येथे एका ट्रकच्या धडकेत धरणगाव येथील वकील ठार झाल्याची घटना ताजी असतांना शुक्रवारी जळगाव शहरातील मुख्य टॉवर चौकात भरधाव डंपरने कारला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले.
मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील टॉवर चौकात शुक्रवार, 24 मार्च रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एम.एच.19 बी.जे.7917) ही नेहरू पुतळ्याकडून टॉवर चौकात येत असतांना त्याच वेळी शिवाजी नगरकडून चित्रा चौकात जात असलेला डंपर (एम.एच.19 झेड.4100) ने कारला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील शिक्षिका सविता अशोक सानेवणे (40, रामानंद नगर, जळगाव) आणि शिक्षक विठ्ठल रूपसिंह चव्हाण (42) आणि सोबत असलेले रजियाबाद तडवी हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. यावेळी जवळच असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात आले. तिघांना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अपघातानंतर डंपर चालक हा डंपर सोडून पसार झाला असून डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.