जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२४
मामासोबत जेवणाचे पार्सल घेण्यासाठी जात असलेल्या बोज धीरज बन्नाटे (वय ९. रा. सिनापार्क) या भाच्याला भराव बाळूच्या डंपरने चिरडले. ही घटना बुधवारी सायंकाळी सच्चासात वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कार्यका माता चौकात पडली. संतप्त जमावाने डंपर बालकाला अटकेची मागणी करीत इंपर जाने यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळे जमाव अधिच संतप्त होत त्यांनी महामार्ग रोखून धरला होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध बालू वाहतुकीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगर परिसरातील लीला पार्कमध्ये दूध विक्री कें द्र चालविणारे धीरज बऱ्हाटे हे पत्नी व दोघ मुलांसह वास्तव्यास आहे. बुधवारी भादली येथे राहणारे त्यांचे शालक योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हा भाची भक्ती आणि भाचा योजस याच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील योगेश बेंडाळे व भक्ती हे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले तर योजस हा डंपरच्या चाकाखाली आल्याने तो जागीच ठार झाला. तर त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले.
ही घटना घडताच डंपर चालक डंपर सोडून तो तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच आमदार राजूमामा भोळे त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी जमावाने आ. भोळेंकडेही घटनेची माहिती दिली. याप्रसंगी पोलीस अधिकारी आ. भोळेंच्या अंगावर धावून आल्याने जमाव अधिकच संतप्त झाला. यावेळी नागरिकांसह आ. भोळे यांनी देखिल डंपर चालकाच्या अटकेसाठी महामार्गावर ठिय्या मांडला होता. सुमारे दोन तासानंतर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि त्यानंतर डंपर क्रे नच्या सहाय्याने रस्तच्या बाजूला करीत वाहतुक सुरळीत केली.