जळगाव मिरर / ३० मार्च २०२३ ।
शहरापासून जवळ असलेल्या महाविद्यालयातून दोन तरूण दुचाकीने घरी परतत असताना त्यांची दुचाकी थांबवत दोन जणांनी त्यांना लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेले दोन तरूण शिरसोली रोडवर असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दि २८ रोजी नेहमीप्रमाणे घरी परतत असतांना शहरातून जवळ असलेल्या कृष्णा लोन्स याठिकाणी दोन अनोळखी तरुणांनी त्यांची दुचाकी थांबवीत त्यांना मारहाण करीत त्यांच्या जवळील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल व २ हजार रुपये किमतीची गळ्यातील चांदीची चैन घेत घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी तरुणांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत दि २९ मार्च रोजी दोन अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविद्र गिरासे हे काम पाहत आहेत.