जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२४
जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून हाणामारीसारख्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच शहरातील अयोध्या नगर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका 45 वर्षीय डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मेडिकल समोर उभ्या तरुणांना शिवीगाळ करू नका अस डॉक्टर बोलल्याचा राग आल्याने आठ ते दहा तरुणांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या बेदम मारहाणीत डॉक्टर जखमी असून नाक आणि हाता पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मारहाण करताचा व्हिडीओ समोर आला आहे. डॉक्टरला रक्त येईपर्यंत सात ते आठ जणांनी मारहाण केलीये. शुल्लक कारणावरून तिथे असलेल्या तरूणांनी डॉक्टरला मारहाण केली. डॉक्टरांना मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. आठ ते दहा जणांचा टोळक्याकडून बेदम मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ समोर आला आहे. आठ ते दहा जण तरुण एका डॉक्टरला नाका तोंडातून रक्त निघे पर्यंत मारहाण करत असल्याचा व्हीडिओ मध्ये दिसत आहे.या घटनेप्रकरणी जखमी डॉक्टर योगेश बसे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 ऑगस्ट रोजी एकीकडे हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडली असताना दुसरीकडे डॉक्टरला बेदम मारहाण झाल्याच्या या घटनेने पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.