• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

त्या वादग्रस्त खुल्या भूखंड प्रकरणी संस्थाअध्यक्षांना १५ दिवसांची मनपाची अंतिम नोटीस

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 5, 2026
in जळगाव
0
जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर |५ ऑगस्ट २०२६

जळगाव शहरातील १०३ निमखेडी शिवारातील वादग्रस्त खुल्या भूखंडाबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी जळगाव महानगरपालिकेचे महापौर व आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत संबंधित जागेचा पंचनामा करण्यात आला होता.

अतिरिक्त आयुक्त सौ. बाविस्कर यांच्या आदेशानुसार नगररचना विभागाचे नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता अतुल पाटील, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर व मनपा कर्मचाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी जागेवरील खोल्यांचे मोजमाप करण्यात आले. पाहणीदरम्यान काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्य साठवलेले आढळले, तर काही ठिकाणी नागरिक वास्तव्यास असल्याचेही निदर्शनास आले.

संबंधित जागेचा पंचनामा पूर्ण झाल्यानंतर अंतिम नोटीस देण्यासाठी नगररचना विभागाने जवळपास एक महिन्याचा कालावधी घेतल्याने परिसरातील नागरिकांसह तक्रारदार ॲड. पियुष पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

युवा विकास फाउंडेशन संचलित सीताबाई गणपत भंगाळे शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष यांना मनपा मालकीच्या जागेवर नियमबाह्य उभारण्यात आलेल्या बांधकामाबाबत अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.

या प्रकरणात यापूर्वीही दोन नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित संस्थेकडून बांधकाम परवानगी किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आलेली नसल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम अतिक्रमण असल्याचे गृहीत धरून ते का पाडण्यात येऊ नये, याबाबत १५ दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महानगरपालिकेने दिलेल्या अंतिम नोटीसमध्ये १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत समाधानकारक खुलासा किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्यास अतिक्रमण विभागामार्फत जेसीबीच्या सहाय्याने संबंधित बांधकाम हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तक्रारदार ॲड. पियुष पाटील यांची मनपा प्रशासनावर नाराजी

या संदर्भात तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी सांगितले की, संबंधित संस्थेला यापूर्वी दोन वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्या वेळीही बांधकाम परवानगी, न्यायालयीन स्थगिती अथवा अन्य कायदेशीर कागदपत्रे सादर करण्यात आलेली नव्हती. असे असतानाही अंतिम कारवाई करण्यास झालेला विलंब संशयास्पद असून नगररचना विभाग संबंधितांवर मेहरबान असल्याचा संशय निर्माण होत आहे.

तसेच, मनपा व संस्थेमधील करारनाम्यानुसार आणि मंजूर बांधकामाच्या अटींनुसार वाढीव अतिक्रमण आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता ते हटविण्याचा तसेच त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे. त्यामुळे पुन्हा अंतिम नोटीस देण्याची आवश्यकता काय होती, असा प्रश्नही ॲड. पाटील यांनी उपस्थित केला आहे. सामान्यांवर कारवाई करताना मनपा प्रशासन २४ तासांची मुदत देते मात्र धनधान्यांवर कारवाई करताना मनपाचे कोणाला माहित नसलेले नियम देखील अमलात आणले जातात म्हणत प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

पंचनाम्यानंतर तब्बल एक महिना कारवाई प्रलंबित का ठेवण्यात आली, याबाबत आयुक्तांकडे स्वतंत्र तक्रार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Posts

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !
क्राईम

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

August 5, 2026
मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत
क्राईम

मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

August 5, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

संभाजीनगरहून जळगावात आले, पाठलाग केला अन् १२.५० लाखांवर डल्ला

August 5, 2026
डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !
क्राईम

डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !

August 5, 2026
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !
जळगाव ग्रामीण

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !
जळगाव

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

August 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !

त्या वादग्रस्त खुल्या भूखंड प्रकरणी संस्थाअध्यक्षांना १५ दिवसांची मनपाची अंतिम नोटीस

August 5, 2026
जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

August 5, 2026
मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

August 5, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

संभाजीनगरहून जळगावात आले, पाठलाग केला अन् १२.५० लाखांवर डल्ला

August 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group