जळगाव मिरर / ३१ मार्च २०२३ ।
शिरसोली रोडवरील महाविद्यालयातून दुचाकीवर मित्रासोबत घरी येत असतांना दोघांनी चाकूचा धाक दाखवित मारहाण करीत तरुणाला लुटल्यााची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरातील श्रीकृष्ण लॉन्स परिसरात घडली होती. सोबत असलेल्या मित्राने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने प्लॅन तयार करुन हा गुन्हा केल्याचे उघड झाले असून एमआयडीसी पोलिसांनी तरुणाला लुटणार्या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील किसनराव नगरातील अभिषेक जगन्नाथ निंभोरे हा तरुण त्याचा मित्र साहिल विजय कासार याच्योबत मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास मोटारसायकलने रायसोनी इंजिनिअरींग कॉलेजकडून जळगावकडे येत होते. मेहरुण तलाव परिसरातील श्रीकृष्ण लॉन्सजवळ रस्यावर उभ्या असलेल्या दोन तरुणांनी दुचाकीस्वार तरुणांना अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवित मोबाईल व चांदीची चैन असा एकूण 17 हजारांचे ऐवज लुटला होता.
याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरविली असता, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना माहिती मिळाली की, अभिषेकचा सोबत असलेला त्याचा मित्र साहील कासार याने त्याच्या इतर दोन साथीदाराच्या मदतीने या गुन्ह्याचा कट रचला असल्याचे त्यांना समजले. त्यांनी लागलीच साहिलला ताब्यात घेतले. साहिल कासार याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार भोला अजय सरपटे (वय-22, रा. नवल कॉलनी) व आतिष नरेश भाट (वय-23, सिंगापूर कंजरवाडा) यांच्या देखील मुसक्या आवळल्या. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी साहिल याने त्याचा मित्र अभिषेक सोबत जात असतांना लुटमारा करा असे सांगितले होते. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासातच पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, सफौ अतुल वंजारी, पोना सुधीर साळवे, इम्रान सैय्यद, पोकॉ छगन तायडे, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे यांच्या पथकाने केली.