जळगाव मिरर / २८ एप्रिल २०२३ ।
भुसावळ विभागातील काही मोठ्या स्थानकांवर रेल्वे रिटायरिंग रूमची सुविधा उपलब्ध आहे. अनेकवेळा स्थानकावर पोहोचल्यानंतर ट्रेन लेट होत असते किंवा लांब प्रवास करून लेट झाल्यानंतर रात्री उशिरा स्थानावर पोहोचवते, अशा वेळेस आता चिंता करायची गरज नाही. ज्या रेल्वेस्थानकावर रिटायरिंग रूमची व्यवस्था आहे त्या स्थानकावर २५ रुपयांमध्ये आपण एसी रूम बुक करू शकता. रूम बुक करण्यासाठी आयआरसीटीसी वेबसाइटवरसुद्धा सुविधा उपलब्ध आहे.
रेल्वेस्थानकावर प्रवासी आपल्या गरजेनुसार सिंगल, डबल बेडरूम बुक करू शकतात. याशिवाय डॉरमेट्री रूमदेखील उपलब्ध असलेल्या ठिकाणी तेथेही बुक करू शकता. ज्यामध्ये एका स्वरूपात अनेक लोकांच्या राहण्याची सोय असते. हे रूम एसी आणि नॉन एसी अशा दोन्ही कॅटेगिरीमध्ये उपलब्ध असतात. या रूमला किमान एक तास किंवा ४८ तासांसाठी बुक करू शकता. काही स्थानकावर तासाच्या हिशोबाने बुकिंग करता येते.
सहसा या रूम किमान १२ तास किंवा कमाल ४८ तासांसाठी बुकिंग केली जाते. सिंगल प्रवासी स्वतःसाठी हवे असेल तर सिंगल बेडरूम, एक डबल बेडरूम किंवा डॉरमेट्रीमध्ये एक सिंगल बुक करू शकता. दोन प्रवाशांसाठी हवे असल्यास, डबल बेडरूम बुक करू शकता किंवा डॉरमेट्रीमध्ये दोन बेड बुक करू शकता. एका पीएनआरवर जास्तीत जास्त सहा प्रवाशांसाठी रूम बुक केल्या जाऊ शकतात.