जळगाव मिरर | १९ जुलै २०२४
पारोळ्याकडून पाचोऱ्याच्या दिशेने जात असलेल्या भरधाव वाहनाने शहरातील भवानी बागेजवळ अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने मोठा अनर्थ टळला. वाहनातील कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथील कारने (एमएच१२ एफके५६९८) सारे प्रवासी पाचोरा येथे जात होते. भडगाव शहरातील जुना पारोळा रोड भवानी बागेजवळ वाहनाने अचानक पेट घेतला. गाडीत जोगलखेडे येथील कुटुंबीय होते. गाडीने पेट घेतल्याचे दिसताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्यांच्या सतर्कतेमुळे कुटुंबीयातील सर्व सदस्यांना सुरक्षितरीत्या गाडीबाहेर काढण्यात आले. यावेळी नागरिकांनी पाणी टाकून आग विझविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नजीकच्या एका गॅरेजच्या मालकाने गाडीजवळ पोहोचत बोनेट उचकावत वायर तोडल्या