• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा : वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 20, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा : वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० नोव्हेंबर २०२६

एल निनोच्या प्रभावामुळे सन २०२६-२७ मध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वैयक्तिक शेततळे घटकांतर्गत महा-डीबीटी पोर्टलवरील प्रतीक्षा यादीतील सर्व १०० टक्के अर्जांची निवड करण्यात आली असून, राज्यातील एकूण ८७ हजार १७४ शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

पर्जन्याधारित शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता वाढवून संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनुदान तत्त्वावर वैयक्तिक शेततळे योजना राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात व उत्पन्नात वाढ होण्यासह त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेततळ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन या घटकावर विशेष भर देण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार महा-डीबीटी पोर्टलवरील प्रतीक्षा यादीतील सर्व अर्जांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ३ हजार ९२५, अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५ हजार ३७९ आणि इतर प्रवर्गातील ७७ हजार ८७० अशा एकूण ८७ हजार १७४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे महा-डीबीटी (आपले सरकार) पोर्टलवर अपलोड करण्याबाबत त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठविण्यात आले आहेत. यामध्ये हमीपत्र (परिशिष्ट-२), तसेच आवश्यकतेनुसार जातीचा दाखला किंवा दिव्यांग प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी लघुसंदेश प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. अपलोड करण्यात येणारी कागदपत्रे सुस्पष्ट व अद्ययावत असणे आवश्यक आहे. विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड रद्द करण्यात येईल.

योजनेच्या पुढील प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत भ्रमणध्वनीवरील लघुसंदेश तसेच महा-डीबीटी पोर्टलद्वारे वेळोवेळी सूचना देण्यात येणार आहेत. निवडीनंतर पूर्वसंमती प्राप्त झाल्यावर योजनेतील सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून विहित मुदतीत शेततळ्याचे काम पूर्ण करणारे शेतकरीच अनुदानासाठी पात्र राहतील.

त्यामुळे निवड झालेल्या शेतकऱ्यांनी मुदतीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून पुढील कार्यवाही पूर्ण करावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Related Posts

जळगावात दुचाकी चोरीचा पर्दाफाश; दोघांच्या मुसक्या आवळल्या, ५ दुचाकी जप्त
क्राईम

जळगावात दुचाकी चोरीचा पर्दाफाश; दोघांच्या मुसक्या आवळल्या, ५ दुचाकी जप्त

November 20, 2026
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार
क्राईम

पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय! तीन पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या

November 20, 2026
तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने बाळद बुद्रुक हादरले; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
क्राईम

तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने बाळद बुद्रुक हादरले; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

November 19, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

घरभाडे अन् मुलीच्या शिक्षणासाठी पैसे मागणे पडले महागात; जेठाच्या धक्क्याने विवाहिता जखमी

November 19, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

एकाच नावाचा आधार घेत बनावट दस्तांचा खेळ : मेहरुणमधील लाखोंची जमीन हडपल्याचा आरोप !

November 19, 2026
महापालिकेच्या बंद वाहनांवर उपमहापौरांचा बडगा : तातडीने दुरुस्तीचे अधिकाऱ्यांना आदेश!
जळगाव

महापालिकेच्या बंद वाहनांवर उपमहापौरांचा बडगा : तातडीने दुरुस्तीचे अधिकाऱ्यांना आदेश!

November 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा : वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा : वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

November 20, 2026
जळगावात दुचाकी चोरीचा पर्दाफाश; दोघांच्या मुसक्या आवळल्या, ५ दुचाकी जप्त

जळगावात दुचाकी चोरीचा पर्दाफाश; दोघांच्या मुसक्या आवळल्या, ५ दुचाकी जप्त

November 20, 2026
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार

पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय! तीन पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या

November 20, 2026
तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने बाळद बुद्रुक हादरले; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने बाळद बुद्रुक हादरले; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

November 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group