जळगाव मिरर | ६ मार्च २०२४
शहरातील आर.आर.शाळेसमोर असलेले कुणाल फार्मा मेडिकल रविवारी रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमांनी मेडिकल दुकानातून ७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जिजाऊ नगरातील रहिवासी कुणाल आनंदा पाटील हे आई, वडील, पत्नीसह वास्तव्यास असून ते मेडिकल चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दि. ३ रोजी सकाळी १० वाजता नेहमी प्रमाणे दुकान उघडे करून रविवार असल्याने दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून ते निघून गेले, त्यानंतर रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील ७ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना पहाटे दुकानाजवळील एकाला दुकान उघडे दिसले असता त्यांनी लागलीच दुकान मालक कुणाल पाटील यांना फोनवरून माहिती दिली, कुणाल पाटील यांनी लागलीच दुकानात आले असता त्यांना दुकानाचे शटर उघडे दिसले असतात. जिल्हा पेठ पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.