
जळगाव मिरर / २८ एप्रिल २०२३ ।

जामनेर शहरातील एका परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भुसावळ रोडवरील स्वामी रेडियम दुकानाजवळ १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही बहिणीसोबत २७ एप्रिल शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता लस्सी पिण्यासाठी दुकानावर आली असता अनोळखी व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी कारण सांगून फूस लावून अपहरण केले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा जामनेर शहरातील बाजारात शोध घेतला परंतु कुठेही तरुणी न आढळल्याने जामनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी सात वाजता धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल वाटे करीत आहे.





















