
जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२४
शहरातील एका भागात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेली. ही घटना मंगळवार सायंकाळच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार दि. ३ रोजी सायंकाळच्या सुमारास याच परिसरामध्ये राहणारा आवेश चांद पटेल यांनी पळवून नेले. या अल्पवयीन मुलीला चांद हसन पटेल यांनी सहकार्य केले. याबाबत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे त्यानुसार बुधवारी चार डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आवेश चांद पटेल आणि चांद हसन पटेल दोन्ही रा. हरी विठ्ठल नगर जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.