जळगाव मिरर / १ एप्रिल २०२३ ।
पाचोरा शहरातील आठवडे बाजार परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने पळवून नेल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील आठवडे बाजार परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी परिवारासह वास्तव्यास आहे. दि ३१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीने आईला सांगितले कि, आधार कार्डची झेरोक्स घेवून येते असे सांगत गेली असता पुन्हा परत न आल्याने काही वेळ परिवाराने शोधा शोध केली असता मिळून न आल्याने पाचोरा पोलिसात धाव घेत अनोळखी इसमा विरोधात अल्पवयीन मुलगी पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.कैलास पाटील हे करीत आहेत.
