
जळगाव मिरर | २४ मे २०२५
जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी २१ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २२ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कठोरा आणि किनोद गावाच्या दरम्यान असलेल्या पेट्रोलपंपाचा जवळून संशयित आरोपी विनोद बाविस्कर रा. सावखेडा याने काहीतरी आमिष दाखवत पीडित मुलीला फूस लावून पळवून नेले. दरम्यान ही घटना तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा शोध घेतला. तिच्याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर त्याच्या पालकांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी विनोद बाविस्कर याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.