जळगाव मिरर | 11 डिसेंबर 2023
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच चोपडा तालुक्यातील एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात 7 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.10 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीस टिव्ही पाहण्यास घरात चल असे म्हणून घरात नेत चुकीचे कृत्य केले. यानंतर अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार आपल्या परिवारातील सदस्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी चोपडा ग्रामीण पोलिसात धाव घेत संशयित आरोपीच्या विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल नंदवाळकर हे करीत आहेत.