जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२३
गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणारा अत्याचाराचे प्रमाण नियमित वाढले आहे याचीच पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. ज्या परिसरातून सर्वच विध्यार्थी विद्या घेत असतात त्या विद्येच्या घरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग घडला असल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात चौघा आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावदा येथील गौसिया नगर येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनी शिक्षण घेत असून विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेच्या कार्यालयात बोलवण्यात आले तुला नवीन ड्रेस देतो त्यासाठी टेलरला माप द्यावे लागेल असे आम्हीच देत विद्यार्थिनींना कार्यालयात बोलून दरवाजा आतून बंद करीत कार्यालयाचे लाईट बंद करून कपड्याची माप घेण्याच्या पाहण्याने तिच्यासोबत अतिशय घृणास्पद वर्तन केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस स्थानकात अक्रम खान अमानुल्ला खान, इरफान खान जमशेद खान, फिरोज खान सुपडू, शेख अशरफ शेख सईद यांच्यावर विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहे.