अमळनेर : विक्की उत्तम जाधव
राज्यातील वातावरण भाजपाच्या विरोधात असून 2024 ला आपलंच महाविकास आघाडीच सरकार येईल त्यामुळे येणारी पालिका निवडणूक देखील आपण जोमाने लढवून कोणत्याही परिस्थितीत पालिकेची सत्ता आपल्याच हातात येईल असा विश्वास आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आगामी नगरपालिका निवडणूक संदर्भात इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.
उमेदवारांना काहो टिप्स देण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठकीचे आयोजन आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते,यावेळी प्रा अशोक पवार यांनी उमेदवारांनी संपुर्ण जवाबदारी आमदारांवर न सोडता कार्यक्षम व्हावे,आपल्या आमदारांच्या माध्यमातून जेथे निधीचे वितरण झाले असेल किंवा लाभ मिळालेले निराधार योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्या पर्यंत आपण पोहोचले पाहिजे,ज्याचे आपण काम केले त्याच्यावर प्रेमाचे प्रेशर टाकून आपलेसे केले पाहिजे,नगरपालिका आपल्या प्रतिष्ठेचा विषय असून आघाडीच्या माध्यमातून आपल्या ताब्यात आलीच पाहिजे आपला नेता सक्षम आणि भक्कम असल्याने घाबरण्याचे कारण नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यानंतर विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, ऍड यज्ञेश्वर पाटील,देविदास देसले,राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे कैलास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
आपल्या मार्गदर्शनात आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की कोविड कालावधीत आपण सर्व डॉक्टर एकत्र करत मोठा कॅम्प घेतला,ग्रामिण रुग्णालयात 50 लाख खर्च करून सर्व सामुग्री उपलब्ध केली, आमदार म्हणून मी पीडित लोकांच्या मागे उभा राहिलो,यशस्वी क्वारांटाईन सेंटर चे नियोजन आम्ही केले,तेथे बाधित लोकांसोबत जेवलो ,रुग्ण व डॉक्टरांना धीर दिला,म्हणून कोरोनाचा आकडा कुठेतरी नियंत्रणात राहिला यामुळे लोक आपल्या या कार्याची निवडणुकीत नक्कीच आठवण ठेवतील,आज सोन्या सारखे कार्यकर्ते माझ्याकडे असल्याने मला चिंता नसून कार्यकर्ते सांगतात ते मार्गी लावण्याचा प्रयत्न माझा असतो,कठीण काळात तुम्ही पाठीशी राहिले तेव्हा आमदारकी मिळवली आता तर आपण फार पुढे आहोत,आता या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने मायक्रो प्लॅनिंग करणार असून प्रत्येक भागात बूथ वाईज भक्कम टीम निर्माण करायची आहे ,17 प्रभागात रचना लावून,प्रत्येक प्रभागात प्रत्येक बुथवर 25 कार्यकर्ते तयार करा,उमेदवाराच्या मागे टीम दिसली की नेत्यांसाठी तो विजयी उमेदवार ठरतो, कसबा मतदारसंघात रविंद्र धंगेकर यांच्या सारखा सामान्य कार्यकर्ता केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर आमदार होतो हे मोठे उदाहरण असून यासाठी जनसंपर्क वाढवून सक्षम टीम उभी करा.राष्ट्रवादी आणि संपुर्ण महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला.
यावेळी सूत्रसंचालन विनोद कदम यांनी.यावेळी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, अशोक पवार, माजी नगरसेवक राजेश पाटील, विवेक पाटील, सुरेश पाटील,संतोष पाटील,संजय भिला पाटील यासह शेकडो कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या.