
जळगाव मिरर | १४ जून २०२६

एमएचटी-सीईटी आणि एचएससी बोर्डाच्या तयारीसाठी उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची पहिली पसंती म्हणून मोशन जळगावने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यंदाच्या एमएचटी-सीईटी पीसीबी गटाच्या निकालात मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या उत्कृष्ट शैक्षणिक परंपरेवर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.
एमएचटी-सीईटी पीसीबी गटात रहिला एजाज खान हिने 96.41 टक्के गुण मिळवत संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला. दिपिका ज्ञानेश्वर तेली हिला 95.59 टक्के, धनंजय अविनाश पगारे याला 94.23 टक्के, अलीना शहेबाज शेख हिला 94.06 टक्के, मयूर वाल्मिक नेरे याला 93.93 टक्के, भूमी विनोद पाटील हिला 93.67 टक्के, अश्विनी रवींद्र पाटील हिला 90 टक्के, नवीन सुधीरकुमार श्रीखंडे याला 89 टक्के, धनश्री विलास पाटील हिला 87.61 टक्के, दुर्गेश भगवत मराठे याला 81 टक्के तर काव्या चंद्रकांत पाटील हिला 76 टक्के गुण मिळाले.
गेल्या काही वर्षांपासून मोशन जळगावने एमएचटी-सीईटी, जेईई आणि नीटसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने उत्कृष्ट निकाल देत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास संपादन केला आहे. नियोजनबद्ध अध्यापन, अनुभवी शिक्षकवर्ग, नियमित चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन आणि बोर्ड व स्पर्धा परीक्षांचा एकत्रित अभ्यासक्रम ही संस्थेची जमेची बाजू मानली जाते.
संस्थेचे संचालक श्री प्रदीप चव्हाण आणि श्री नितीन पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी काळातही गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम निकालांची परंपरा कायम ठेवण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
एमएचटी-सीईटी आणि एचएससी बोर्डाच्या तयारीसाठी परवडणारी फी, दर्जेदार मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण निकालांच्या जोरावर मोशन जळगाव हे विद्यार्थ्यांच्या यशाचे विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयास आले असून, यंदाही नवीन प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. “मोशन आहे तर भरोसा आहे” हे ब्रीदवाक्य यंदाच्या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.





















