
जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२४
घराजवळ असलेल्या वापरत्या बोळमध्ये रॉमटेरियल टाकून त्यांचा रस्ता बंद केला. त्याबाबत विचारणा केली असता, मुकेश तुलसीदास टेकवाणी (रा. नवीपेठ) यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना दि. २४ रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीपेठ परिसरात मुकेश तुलसीदास टेकवाणी हे वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळ असलेल्या त्यांच्या वापरण्याच्या बोळमध्ये सपन सुशीलकुमार झुनझुनवाला यांनी रॉ मटेरीयल टाकून त्यांचा रस्ता बंद केला. दरम्यान, टेकवाणी यांनी त्यांना रस्ता मोकळा करण्या सांगितले असता, झुनझुनवाला यांनी त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार टेकवाणी यांनी लागलीच शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सपन सुशीलकुमार झूनझुनवाला (रा. आनंद नगर, जिल्हापेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ योगेश बोरसे हे करीत आहे.