जळगाव मिरर | १ मार्च २०२४
शाळेत जाण्यासाठी सोडलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला मित्राच्या रुमवर नेवून तीच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अत्याचार करणाऱ्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलिसांनी संशयित अत्याचार करणाऱ्या हर्षल दीपक सोनवणे (वय २१, रा. भुसावळ) याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. या तरुणीला दि. १ जानेवारी रोजी मुलीच्या कुटुंबियांनी तिला शाळेत जाण्यासाठी सोडले. परंतु त्या मुलीला शाळेच्या गेटजवळून संशयित हर्षल सोनवणे याने दुचाकीवर बसवून भुसावळ तालुक्यातील खेडी गावात त्याच्या मित्राच्या रुमवर घेवून गेला.
त्याठिकाणी संशयित हर्षल याने मुलीवर अत्याचार केल्याची उघडकीला आला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. २८ फेब्रुवारी रोजी संशयित हर्षल सोनवणे यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे हे करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, अनिल कांबळे, राहुल पाटील, राहुल घेटे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने संशयित हर्षल सोनवणे याला भुसावळ येथून अटक केली आहे.