• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 19, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ जून २०२६ 

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर 19 जून रोजी देशभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), जळगाव कार्यालयातर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या जैन हिल्समधील गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह येथे उद्या दि. 19 ला संध्याकाळी 4 वाजेला विकसीत भारत या संकल्पनेतून पीएम-व्हीबीआरवाय ह्या योजनेतील विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे ₹2,400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना (डीबीटी) द्वारे हस्तांरीत केले जाणार आहे.

जळगाव येथील कर्मचारी भविष्य निधी संघटनेतर्फे प्रादेशिक कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमास महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, जळगावचे आमदार सुरेश भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्यांच्यासोबत विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित उपस्थीत राहणार आहेत. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, नियोक्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात केंद्रीय कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे उपस्थीत असतील. पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे ₹2,400 कोटींचे प्रोत्साहन अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने वितरित केले जाईल. या माध्यमातून देशभरातील 15 लाखांहून अधिक नागरिकांना अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध होण्यास चालना मिळणार आहे. PM-VBRY ही रोजगारनिर्मितीला चालना देणारी केंद्र सरकारची रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना असून, प्रथमच संघटित क्षेत्रात रोजगार मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाएवढी, कमाल ₹15 हजारांची मदत दिली जाते. तसेच अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाते.

देशभरात दोन वर्षांत 3.5 कोटींहून अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेसमोर ठेवण्यात आले आहे. पुणे क्षेत्रात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 75,711 कर्मचाऱ्यांना ₹42.79 कोटींपेक्षा अधिक लाभ, तर 6,351 नियोक्त्यांना ₹145.16 कोटींपेक्षा अधिक प्रोत्साहन वितरित करण्यात आले आहे. देशभरातील 200 ठिकाणी एकाचवेळी होणाऱ्या या कार्यक्रमात 9 हजार नियोक्ता प्रतिनिधी आणि 45 हजार कर्मचारी सहभागी होतील. कार्यक्रमांमुळे रोजगार निर्मिती, रोजगाराला प्रोत्साहन आणि सामाजिक सुरक्षेचा विस्तार या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळेल, जैन हिल्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात जळगाव कर्मचारी भविष्य निधी संघटनेतील प्रादेशिक परिसरातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय भविष्य निधी आयुक्त-2 मनोज कोळी, सहाय्यक भविष्य निधी आयुक्त मोहित दीक्षित यांनी केले आहे.

Related Posts

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !
जळगाव

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी
जळगाव

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026
क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !
जळगाव

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

June 19, 2026
गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !
जळगाव

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

June 19, 2026
मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा  !
क्राईम

मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा !

June 19, 2026
जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !
क्राईम

जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026
क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

June 19, 2026
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group