जळगाव मीरर | १८ जुलै २०२५
अहोरात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या बांधवांसाठी हृदयाचे भावा बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त सालाबाद प्रमाणे आपले कर्तव्य मानून नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी जळगाव तर्फे जम्मू काश्मीर, लेह लदाख, अरुणाचल प्रदेश,तवांग,सिक्कीम, या ठिकाणी राख्या पाठविण्यात आल्या या भावा बहिणीचे नाते दृढ करणाऱ्या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव येथे पाठवण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ निलेश प्रकाश पाटील, ऑ सुभेदार मेजर श्री संजय रामराव गायकवाड यांना या राख्या पाठवण्यासाठी सोपविण्यात आल्या या प्रसंगी भावना व्यक्त करताना सुभेदार संजय गायकवाड हळवे होऊन त्यांना अश्रू अनावर झाले व त्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.ही सुंदर संकल्पना नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थांच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांना सुचली आणि सतत गेल्या ५ वर्षापासून सैनिक बांधवांना राख्या पाठविल्या जात आहे.
याप्रसंगी मेजर (डॉ) निलेश प्रकाश पाटील (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव, ऑ सुभेदार मेजर श्री. संजय रामराव गायकवाड (नि.) सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव, सौ मनिषा पाटील, वंदना मंडावरे, आशा मौर्य, किमया पाटील, कांचन पाटील, हर्षा गुजराती, शिल्पा बयास, श्रावणी पाटील ,शोभना मकवाना. उपस्थित होत्या
