
जळगाव मिरर / ७ एप्रिल २०२३

जळगाव शहरात अचानक झालेल्या मेघ गर्जनेसह व वारावादळाने एका लॉन्ड्रीधारकाच्या घरावर झाड पडून घराचे पत्रे वाकले आहे. सुदैवाने कुठलेही हानी यामध्ये झालेली नाही.
शहरातील दुध फेडरेशन रोड परिसरात असलेले भारत नगर परिसरातील रहिवासी असलेले मंगेश मोतीराम बोदडे(वय 39) हे लॉन्ड्री चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. आज दि.7 रोजी सायंकाळी 7 वाजेपासून शहरातील काही भागात विजाचा कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरु झाला असतांन घराशेजारी लावलेले कडूनिंबाचे झाड रात्री अचानक कोसळून घराच्या पत्र्यावर पडले. यावेळी बोदडे यांच्या घरात पत्नी वैशाली बोदडे व वडिल मोतीराम बोदडे हे होते. झाड जसे घरावर पडले तसे घराची पत्रे वाकले असता घरात जोरदार आवाज झाल्याने वडिल व पत्नी बाहेर आले असता त्यांना घरावर झाड पडल्याचे दिसून आले. यावेळी परिसरातील प्रमोद वाडेकर, जितू पाटील यांच्यासह काही नागरिकांनी मदत करीत असल्याची माहिती मंगेश बोदडे यांनी दिली आहे.




















