जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२४
भुसावळ तालुक्यातील चोरवड गावाजवळ अंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभरीरित्या जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कुन्हे पानाचे येथे प्रशांत अशोक पाटील (वय ४२) हे आपल्या परिवारासह राहतात. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार दि. १२ जानेवारी हे आपल्या खासगी कामाच्या निमित्ताने भुसावळला गेले होते. काम आटोपून प्रशांत पाटील रात्री ९ वाजता त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएम २५३६) ने कुन्हा पानाचे येथे येत असतांना चोरवड गावाजवळ अधांरात एक ट्रक क्रमांक (एमएच ३४ एबी १५४६) हा उभा होता. त्यावेळी दुचाकीने जात असलेले प्रशांत पाटील यांना अंधारात ट्रक दिसला नसल्याने भरधाव दुचाकी ट्रकवर आदळली. यात ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने भुसावळ शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत रविवारी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.