जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२४
सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु असतांना एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील मुल्लाजी नगरमधील रहिवासी मनोज मधुकर पाटील (वय ३०) हा तरुण १ नोव्हेंबर सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास कासोदा येथीलच दीपक काशिनाथ वाणी यांच्या शेतातील विहिरीच्या पाण्यात पडला. यानंतर मनोज पाटील यांना तत्काळ पाण्यातून काढून लागलीच एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मयत घोषित केले. याबाबत सुरेश हिंमत पाटील यांनी कासोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश खोंडे करत आहेत.