
जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२४
ऑनलाई न शेअरमार्केटमध्ये ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल. त्यानुसार सुरुवातील राहुल विठ्ठल पाटील (वय ३५, रा. बलवाडी, ह. मु. मोरगाव, खुर्द, ता. रावेर) या तरुणाला ९६९ रुपये नफा देवून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिकच्या नफ्याचे अमिष दाखवित त्याला पावणे सहा लाख रुपयात ऑनलाईन गंडविले. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथे राहुल विठ्ठल पाटील हा तरुण राहत असून तो व्यापारी आहे. दि. २३ सप्टेंबर रोजी त्याला श्रृती अग्रवाल नामक तरुणीचा फोन आला. दि. २९ ऑक्टोंबर पर्यंत त्यांनी सोशल मीडियावरील इलेक्ट्रीक साधनांचा वापर करुन राहुल पाटील यांना एका व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. त्यामध्ये त्यांना ऑनलाईन ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास जास्त प्रमाणात नफा होईल असे खोटे आश्वासन दिले. त्यानुसार राहुल पाटील यांनी एसएमसी नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले, ते अॅप डाऊनलोड केल्यानंतर राहुल पाटील यांनी भरलेल्या रकमेवर त्यांना सुरुवातीला ९६९ रुपये नफा देवून त्यांचा विश्वास संपादन केला.
गुंतवणुक केलेल्या रकमेवर अधिकचा नफा देवून राहुल पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून ऑनलाईन ठगांनी वेगवेगळ्या खात्यावर ऑनलाईन पैसे गुंतवणुक करण्यास सांगितले. गुंतवणुक केलेल्या रकमेवर कुठलाही नफा तसेच ती रक्कम देखील परत मिळत नसल्याने तरुणाला आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर राहुल पाटील या तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार श्रृती अग्रवाल नामक ऑनलाईन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. निलेश गायकवाड हे करीत आहे.