
जळगाव मिरर । ६ मे २०२३ ।

चोपडा तालुक्यातील अवैध लाकड़ाने भरलेल्या भरधाव ट्रैक्टरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना ३ रोजी ९ वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असुन तर दूसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी असलेल्या दुचाकीचा चुराडा झालेला आढळून आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथून भरधाव वेगाने लिंबूच्या लाकड़ानी भरलेला ट्रैक्टर क्र. एमएच 19. एन. 4435 ने चोपड्याहून कृष्णापूरकड़े दुचाकीवर घरी जात असलेल्या दोघांना जबर धड़क दिल्याने हा अपघात झाल्याचे समजते. कृष्णापुर येथील सुकलाल केना पावरा (वय ३५) हा जागीच ठार झाला, तर सुनील पावरा हा जबर जखमी झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, चोपड़ा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.जितेंद्र सोनवणे करीत आहेत.




















