जळगाव मिरर | १३ जुलै २०२६
पैसे न दिल्याच्या रागातून अकील शेख अजगर (वय २५, रा. खडकी चाळ) यांच्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १० जुलै रोजी रात्री कानळदा रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संशयित तन्या उर्फ तन्वीर शेख (रा. गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खडकी चाळ परिसरात राहणारे अकील शेख हे कानळदा रस्त्यावरील एका प्लास्टीकच्या दुकानाजवळ त्यांचा मित्र जाफर शेख जलील यांच्यासोबत गप्पा मारीत उभे होते. यावेळी संशयित तन्वीर शेख उर्फ तन्या हा त्याठिकाणी आला आणि तो मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करीत तू ज्यादा माज गया है क्या मुझे पैसे नही दिये थे तुने अब तुझे देखता हू असे म्हणत त्याने कमरेला खोचलेला चाकू काढून त्याने अकील शेख याच्यावर वार केले. यामध्ये त्यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान अकील शेख यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तनवीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















