जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२४
जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच चाळीसगाव शहरात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेट व १०० रुपये देवून तिला घरी घेवून जात अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि १३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळत असतांना या मुलीस संशयित आरोपीने चॉकलेट व १०० रुपये दिले व चॉकलेट न खाल्यास तुझ्या वडिलांना मारून टाकेल अशी धमकी देखील दिली त्यानंतर अल्पवयीन मुलीला एकाच्या घरी नेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने घडलेली घटना घरी सांगितल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी. दीपक बिरारी हे करीत आहेत.