• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 3, 2026
in Uncategorized
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) छात्रसंघ आणि सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ९ पैकी ९ जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा इतिहास रचला आहे. हा विजय केवळ निवडणुकीतील आकडा नसून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने त्यांच्या सोबत उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांवर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासाचा कौल आहे. शैक्षणिक अडचणी असोत, विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न असोत किंवा त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची गरज असो, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. त्याच कामाची आणि सातत्यपूर्ण संवादाची पोचपावती या निवडणुकीच्या निकालातून मिळाली आहे अशी माहिती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या निवडणुकीत सिनेटसाठी लक्ष्मीकांत होनकळस मोकाशे (BHMS), आदित्य रामकिसन जायभाय (BDS) आणि शुभांकर नितीन मनगटे (MBBS) विजयी झाले आहेत. तसेच छात्रसंघाच्या अध्यक्षपदी रोहित मधुकर माळी (BPTH), उपाध्यक्षपदी यशराज धनंजय काकड (BPTH) आणि मिथिलेश श्रीकृष्ण माहोरे (BAMS), सचिवपदी ज्ञानेश्वर रावसाहेब आंधळे (BHMS), तर सहसचिवपदी केशव शरद पाटील (BSc Nursing) आणि देवांशी प्रशांत भुराणे (BDS) यांनी विजय मिळवला आहे.

अभाविपचे प्रदेश मंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे म्हणाले, “अनेक अडचणी आणि अभाविपविरोधात उभ्या करण्यात आलेल्या चुकीच्या नॅरेटिव्हनंतरही Gen Z ने पुन्हा एकदा अभाविपचीच निवड केली आहे. आजचा युवा जागरूक आहे, तो स्वतः सत्य पडताळतो आणि कामाच्या आधारावर निर्णय घेतो. ९ पैकी ९ जागांवरील हा विजय म्हणजे विद्यार्थ्यांनी अभाविपच्या कामावर आणि विचारांवर पुन्हा एकदा व्यक्त केलेला ठाम विश्वास आहे.”

आजच्या निकालाने विद्यार्थ्यांनी अभाविपला पुन्हा एकदा निवडून देत आपला विश्वास अधिक दृढ केला आहे. सलग तिसऱ्यांदा ९ पैकी ९ जागांवर विजय मिळणे ही अभाविपच्या कार्यकर्त्यांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे; मात्र त्याचवेळी ही मोठी जबाबदारीदेखील आहे. छात्रसंघ अध्यक्ष श्री.रोहित माळी म्हणाले,”विद्यार्थ्यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो केवळ विजयापुरता मर्यादित न राहता आगामी काळातील कामातून सार्थ ठरवण्याची जबाबदारी आमची आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला संवेदनशीलतेने हाताळत, त्यांच्या हक्कांसाठी आणि शैक्षणिक हितासाठी अधिक ताकदीने काम करण्याचा संकल्प या विजयाच्या निमित्ताने अभाविप करते.”

या विजयासाठी सर्व विजयी उमेदवारांचे तसेच निवडणूक प्रक्रियेत अथक परिश्रम घेणाऱ्या अभाविपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी अभाविपवर व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार. विद्यार्थ्यांनी दिलेली ही जबाबदारी अधिक संवेदनशीलतेने स्वीकारत त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा प्रयत्न आगामी काळातही सुरू राहील. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे, नवनिर्वाचित छात्रसंघ अध्यक्ष श्री.रोहित माळी, सीनेट सदस्य आदित्य जायभाय व शुभंकर मनगटे उपस्थित होते.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026
आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी
Uncategorized

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

August 25, 2026
किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !
Uncategorized

किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

August 18, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !
Uncategorized

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group