जळगाव मिरर | १४ जुलै २०२४
शहरातील रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराच्या गल्लीत दुचाकी समोर अचानक कार आल्याने झालेल्या अपघातात ४४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वा. घडली. रुग्णालयात त्यांचे वडील व पत्नीने मृतदेह पाहताच प्रचंड आक्रोश केला.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शास्त्रीनगरातील रहिवासी नीलेश केशव बारी (वय ४४) हे शेती करून शनिवारी रात्री सागर पार्ककडून दुचाकीने घराकडे जात असताना अचानक समोर आलेल्या कारवर धडकले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. एका तरुणाने त्यांना जीएमसी रुग्णालयात दाखल केले. खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. डॉ. अमोल पाटील यांनी मृत घोषित केले.