जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२३
येत्या चार दिवसावर नवीन वर्ष येवून ठेपले आहे तर येणाऱ्या नव्या वर्षात अनेक निवडणुकीला राजकीय नेते सामोरे जाणार आहे. त्यासाठी देशासह राज्यातील राजकीय नेते निवडणुकीसाठी आपल्या पक्षाला बहुमत मिळावे यासाठी आतापासून दौरे व सभा घेणे सुरु केले आहे. यावर आता सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी एक मोठे विधान केले आहे.
अभिनेते पाटेकर म्हणाले कि, ‘२०२४ मध्ये पुन्हा भाजपच येणार असून नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार’, ‘तुम्ही बघाच मोठ्या संख्येने भाजपच येणार. कोण येईल आणि कसा येईल हे सांगता येत नाही. पण आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला ३५० ते ३७५ जागा मिळतील. देशामध्ये भाजपाशिवाय पर्याय नाही. भाजपकडून ऐवढं चांगलं काम चालले आहे. नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.’
या वक्तव्यामुळे नाना पाटेकर चर्चेत आले आहेत. त्यांचा या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामुळे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशामध्ये या निवडणुकीमध्ये यंदा कोणाचे सरकार येणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. अशामध्ये नाना पाटेकरांनी भाजपचेच सरकार येणार असल्याचा जो विश्वास व्यक्त केला आहे. त्यांचा विश्वास कितपत खरा ठरतोय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.