जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता ठाकरे गटाचे सर्वच नेते राज्यात दौरा करण्यास सुरुवात केली असून नुकतेच आदित्य ठाकरे देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे महाराष्ट्र स्वाभिमान सभा आयोजित केली होती. शहरात आज दि.२६ सकाळी बारा वाजता ठाकरे यांचा रोड शो झाला. पैठण विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बॅनर झळकावून शक्ती प्रदर्शन केले. यावेळी त्यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले कि, महिलांचे संरक्षण करण्यासाठी असमर्थ ठरलेल्या भाजपला महिला व तरुणांनी धडा शिकविण्याची वेळ आली आहे, सकाळी बारा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. यावेळी पैठण येथील विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या ठाकरे गटाचे पैठण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी गटबाजीचे दर्शन घडविले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रोड शोला सुरुवात झाली. या रोड शोचा समारोप येथील माहेश्वरी धर्मशाळा येथे करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार चंद्रकांत खैरे, तालुक्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.