जळगाव मिरर / २२ जानेवारी २०२३
मागील १९ वर्षांपासून शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशन व श्री साई बहुरंग जिम तर्फे “जळगाव जिल्हा श्री” जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात येत असते.
या वर्षी सुद्धा सोमवार दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ ते ९.३० वाजेदरम्यान भाऊंचे उद्यान समोर, काव्यरत्नावली चौक जळगाव येथे १९वी “जळगाव जिल्हा श्री” जिल्हास्तरीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभणार आहे.
शिवसेना नेते- युवासेना प्रमुख मा.श्री.आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री, मुंबई येथे सदर स्पर्धेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे, हरिश्चंद्र सोनवणे, भूषण ठाकूर, अक्षय चव्हाण, प्रशांत वाणी, हर्षल मुंढे आदी उपस्थितीत होते. या स्पर्धेकरिता आदित्य ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.