जळगाव मिरर / १४ मार्च २०२३ ।
देशात असे अनेक चित्रपट गाजले आहे कि जे पुन्हा पुन्हा आपल्या पहावेसे वाटतात त्यातील दिग्दर्शक ‘रोहित शेट्टी’चा चित्रपट म्हंटल की डोळ्यासमोर उभी राहते गाड्यांची तोडफोड, हिरो व्हिलनची मारधाड आणि बरच काही. सिंघम, गोलमाल आणि सूर्यवंशी अशा सुपरहिट चित्रपटांची माळ लावल्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित शेट्टी एक नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. स्वतः रोहित शेट्टीने यांदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘सिंघम’, ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ सारखे सुपरहिट कॉप ड्रामा चित्रपट दिल्यानंतर रोहित शेट्टी आता पुढचा कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘सिंघम’चा हा तिसरा भाग असणार आहे. यामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा कडक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक रोहित शेट्टीने’सिंघम अगेन’च्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे.
दरम्यान, आता ‘सिंघम अगेन’च्या रिलीज डेटबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. नुकतंच, अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’च्या रिलीजच्या तारखेबाबत एक मोठे अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘सिंघम अगेन’ दिवाळी 2024 च्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर, जुलै महिन्यापासून रोहित शेट्टी आणि अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.