अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील अमळगाव येथील बीएसएनएल कार्यालयातून कॉपरची केबल चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने मारवाड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील बीएसएनएल कार्यालयातून दि ६ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीची ३० मीटर लांब कॉपरची केबल चोरून नेली आहे. याप्रकरणी मारवाड पोलिसात दि ९ रोजी उपमंडळ अभियंता पंकज रायसिंघानी (वय ४४) यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय पाटील हे करीत आहेत.