अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील महसूल कार्यालयासमोर गणपती विसर्जन वेळेला मिरवणुकीत काही अज्ञात नागरिकांनी भिडे व गोडसे यांचे फोटो भिरकवल्याने अमळनेर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. यासाठी विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकारी यांनी मौन सभा आयोजित करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी कि गांधी जयंतीचे औचित्य साधत दि 28/10/23 गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत जो अनुचित प्रकार घडला त्याना सद्बुद्धी येवो म्हणून तहसील आवाराच्या बाजूला 4 तास मौन सभेस सुरवात झाली यावेळी उबाठा गटाचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी अमळनेर शहरातील वातावरण खराब करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व पोलिसांनी तात्काळ कारवाई का केली नाही असे सांगतीले.
यावेळी उबाठा गटाचे अनंत निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे के. डी पाटील, डी. डी. पाटील, बी. के. सुर्यवंशी, काँग्रेस कमिटीच्या महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, काँग्रेसच्या शहराध्यक्ष नयना पाटील, तालुकाध्यक्ष गोकूळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, सबगव्हानचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, अर्बन बँकेचे प्रविण जैन, मारवड संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, युवा सामाजिक कार्यकर्ते मयुर पाटील, सुभाष पाटील, विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.