अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील नगरपालिकेच्या ५०० कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन मिळण्यासाठी तहसील कार्यालय अमळनेर येथे मोर्चा काढला. नंतर तहसील
कचेरीजवळ सर्व संघटना मिळून आंदोलनकर्त्यांनी जुनी पेन्शन विरोधात शासनाने काढलेल्या जीआरची होळी केली.
जुनी पेन्शन आणि संपाची तीव्रता वाढण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी संघटनांनी पालिकेपासून सुभाष चौक, तिरंगा चौक,
महाराणा प्रताप चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालय येथे आला. त्याठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सामील
होऊन मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेत टीडीएफ संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र राज्य
प्राथमिक शिक्षक संघटना, आरोग्य संघटना, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना, ओबीसी शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना,
ग्रंथपाल संघटना, आरोग्य संघटना, महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना, अशा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी मार्गदर्शन केले आणि पाठिंबा दर्शविला.
जी आर, एनपीएस जी आर, मेस्मा कायदा निर्णय आदी शासकीय जी आर ची होळी करून मोर्चेकऱयांनी निषेध नोंदवला. मोर्चात अनिल बेडवाल,सोमचंद सांदानशीव, पपु कलोसे, राजू चंडाले, अविनाश संदानशीव, राधा नेतले, अरुणा बहारे यांच्यासह अमळनेर नगर पालिकेचे सफाई कर्मचारी हजर होते.