
जळगाव मिरर : ११ जून २०२३

अमळनेर शहरातील दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी ५० ते ६० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील ३१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, शहरात लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून शुक्रवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे दोन गटांत तुफान दगडफेक झाली. याप्रकरणी दोन्ही गटांतील ६१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ३१ जणांना अटक केली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला. यात तलवार हल्ल्यात एपीआय राकेशसिंग परदेशी हे जखमी झाले आहेत. तर दगडफेकीत ३ अधिकारी व ३ कर्मचारी जखमी झाले आहेत.
या प्रकरणी एकूण ३१ जणावर एपीआय परदेशी यांच्या फिर्यादीवरून जिवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, दंगल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील ३१ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून इतरांचा शोध सुरू आहे. सध्या शहरातील वातावरण पूर्णपणे नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे.




















